नांदेड

विमानतळ पोलीसांनी 87 हजार 500 रुपयांचा संशयीत मुद्देमाल पकडला

नांदेड(प्रतिनिधी)- एका ऍटोतून 87 हजार 500 रुपयांचा ऐवज नेतांना विमानतळ पोलीस पथकाने एकाला पकडले आहे.त्याने हा ऐवज चोरलेला आहे असे पोलीसांच्या अभिलेखात नमुद आहे.
दि.8 जून रोजी विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, कानगुले, दारासिंघ राठोड, बालाजी केंद्रे असे दुपारी गस्त करत असतांना सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शोभानगरच्या बाजूस इंदिरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ऍटो क्रमांक एम.एच.26 जी.3628 मध्ये नवीन कपडे भरलेले दिसले. त्याच्याकडे विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देवू शकला नाही. तेंव्हा पोलीसांनी ऍटो आणि त्यातील व्यक्ती सय्यद जाकेर सय्यद जाफर (29) रा.महेबुबनगर नांदेड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे नवीन कपडे होते. ऍटोसह पोलीसांनी 87 हजार 50 रुपयांचा ऐवज संशयीत मुद्देमाल म्हणून जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *