ग्रा.पं.सदस्य,पत्रकार,गावातील युवक कार्यकर्त्यांनी शाळेतील घाण काढण्याच्या मोहीमेत घेतला सहभाग
हदगाव,(प्रतिनीधी)—हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी बाजार येथील जि.प.कें.उच्च प्राथमिक शाळेत घाणीचे साम्राजे होते.कोरोना काळात शाळा बंद असल्याने शाळ हे गप्पा करण्याचे ठिकाण व इतर गोष्टी करण्यासाठी मोकळे होते.परंतु त्यांना वाटले नाही की,आपले बालपणाचे शिक्षण आपण याच शाळेत घेतले या ठिकाणी घाणीचे साम्राजे कसे करावे,शाळा इयत्ता पहीली ते सातवी पर्यंत आसलेल्या जि.प.कें.उच्च प्रा.शाळा वाळकी खु.येथे झाले.असल्याने नेहमी शाळेत गेल्यावर बालपण दिसुन येत असते.परंतु त्या शाळेत घाणीचे साम्राज्य केलेले दिसुन आल्याने ग्रा.पं.सदस्य,पत्रकार,काही युवकानी ही शाळा साफसफाईचे कार्य करुन शाळा आता स्वच्छ करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
यावेळी ग्रा.पं.सदस्य व त्या ठिकाणी घाण काढणार्या युवकांनी बोलतांना म्हटले की,गावातील शाळेत आम्ही शिकलो लहानाचे मोठे झालो,याच शाळेत गावातील आपले लेकर शिकणार आहेत.यासाठी कृपया करुन आपल्या गावातील शाळेमध्ये कोणीही घाण करु नये त्यावर सर्वांचे लक्ष आसाव शाळेला सुरक्षित ठेवावे यापुढे कोणी शाळेत पत्ते,गुटखा,दारु,इतर कोणतेही नाद करण्यासाठी बसु नये जर करता कोणी नाद करण्यासाठी बसाल तर जबाबदारी वाघावे असे साफसफाई करतांना बोलतांना युवक बोलले.कारण शाळा ही देव मंदीरा सारखी आहे.शाळेचे चांगले करा कृपया वाईट करु नका ? यापुढे शाळेत स्वच्छता राखा असे ही साफसफाई करतांना म्हणाले, वाळकीकरांनी या शाळेतुन शाळा शिकुण आनेक विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.यावेळी गावातील ग्रा.पं.च्या सदस्य रामदास दामनवाड,ग्रा.पं.सदस्य सौ. आनिताबाई कदम यांचे प्रतिनीधी म्हणुन मारोतराव कदम,ग्रा.पं.सदस्य परमेश्वर पांडुरंग कदम,सौ.पुष्पलत्ता धर्मा गायकवाड यांचा प्रतिनीधी म्हणुन तथा पत्रकार धर्मराज गायकवाड,प्रहार जनशक्ती पक्षाचे पदधिकारी तथा पत्रकार भगवान कदम,राजु रेखेवाड,शेषेराव गायकवाड,सुरेश वंजारे,दिगांबर गायकवाड इत्यादीनी शाळातील घाण काढण्याचे कार्य केले आहे.