तहसील, पोलीस ठाणे, प्रा.आ.केंद्रात ९५ मास्क, सँनिटायझरचे वाटप
अर्धापुर (प्रतिनिधी) -सभासदांचा अपघाती मृत्यू,नैसर्गिक आपत्ती,देवदर्शन,कोरोना सारखी महामारी अशा कुठल्याही संकटकालीन परीस्थीतीत बुलढाणा अर्बन सामाजिक परीस्थीतीचे भान ठेवून समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहीली असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सुजीत नरहरे यांनी केले.
कोरोनाची तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी बुलढाणा बँकेच्या वतीने व्यवस्थापक रामचंद्र बोंढारे पाटील यांनी अर्धापुरातील तहसील कार्यालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,पोलीस ठाणे यासह शहरात ९५ मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुजीत नरहरे तर प्रमुख पाहुणे आरोग्य अधिकारी विद्या झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी. नांदगावकर,जिल्हा सचीव निळकंठराव मदने,नायब तहसीलदार इटकापल्ले,मुख्याधिकारी मारोतराव जगताप,वैद्यकीय अधिकारी डॉ.एस एस शिंदे डॉ.विद्या पाटील,डॉ.व्ही आर धनगे,सपोनि बळीराम राठोड,सपोनि कपील आगलावे,सपोनि साईनाथ सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाहुण्यांचे हार,शाल देवून बँकेचे व्यवस्थापक रामचंद्र पाटील बोंढारे यांनी स्वागत केले.यावेळी सपोनि नांदगावकर म्हणाले कि, कुठलेही संकट आल्यास अफवावर विश्र्वास ठेवू नये,प्रत्येक संकटाचा उपाय असतो,त्याचा अवलंब प्रत्येकांनी शांतपणे करुन,याकामी सामाजिक संस्थांनी बुलढाणा अर्बन बँकेप्रमाणे समोर यावे असे ते म्हणाले.आरोग्य अधिकारी विद्या झिने म्हणाल्या कि,कोरोनाच्या तिसऱ्या टप्याचे सर्वानी सावध होऊन,शासनाने दर्शविलेल्या नियमांचे पालन करावे,लस प्रत्येकांनी ठरवून दिलेल्या वेळेत घ्यावे,या समाजकार्याचे त्यांनी कौतुक केले. रामचंद्र बोंढारे म्हणाले कि, ३५ वर्षाच्या बँकेच्या वाटचालीत ६ राज्यात कार्यभार चालत असून,१७ हजार करोड रुपायांची उलाढाली झाली आहे. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन अग्रवाल यांच्या सहकार्याने बँकेकडून विविध सामाजिक उपक्रम घेत असतो.निळकंठराव मदने म्हणाले कि,सामाजिक कार्यात ही बँक नेहमी अग्रेसर असते,यासारखे उपक्रम विविध संस्थांनी घ्यावे, असे ते म्हणाले, यावेळी वसंत राऊत,सचिन देशपांडे,लालू गायकवाड,श्रीमती आर एम येम्मेवार,जमादार किर्तीकुमार रणवीर,महेंद्र डांगे,संतोष सुर्यवंशी,भिमराव राठोड,जोशी,प्रफुल्ल नागरगोजे,धर्मा राठोड,गोविंद पानपट्टे,पप्पू चव्हाण,राजकुमार कांबळे,संजय घोरपडे,प्रकाश पवार,श्रीमती एस वाय जाधव,के एन राऊत,सुनील मोरे,संदीप कदम,राहुल माटे, बालाजी मैड,अविनाश खरबे,प्रतिभा तरटे,भालेराव,प्रकाश वाळवे,तलाठी माटे, शेख शफीयोदीन सौ.बनसोडे,रमेश गीरी,देशमुख अनेकांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन वसंत राऊत व प्रस्ताविक आर.बोंढारे पाटील व आभार एस.देशपांडे यांनी मानले.