विशेष

तुझे माझे जमेना पण जुगाराशिवाय करमेना या अटीवर दोन जुगारी एकत्र

शहराच्या पश्चिम भागातील शेवटच्या कोपऱ्याला सुरू होणार म्हणे नवा जुगार अड्डा
नांदेड(प्रतिनिधी)-कांही जुगाऱ्यांनी आपले जुगार अड्डे बंद केल्यानंतर त्यांना काम नव्हते. यातून मार्ग शोधत एक दुसऱ्याशी वैर असणारे दोन जुगार अड्डे चालक एकत्र आले असून लवकरच शहराच्या पश्चिम टोकाला एका मोठा नवीन जुगार अड्डा सुरू करण्यासाठी करार झाले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मागील कांही दिवसांपासून बऱ्याच जुगार अड्डा चालकांचे धंदे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात बंद करण्यात आले होते. त्यामुळे या जुगाऱ्यांना कांही कामच उरले नाही. उखाळ्या-पाखाळ्या करणे या शिवाय कोणतेही दुसरे धंदे नव्हते. तर कांहीनी वाळू उत्खनात आपले हात आजमावले. शहराच्या हस्सापूर भागातून नांदेड शहरात येणाऱ्या रस्त्यावरून त्यांच्या अवैध वाळूच्या गाड्या येत राहिल्या आणि त्यातून त्यांनी बरेच उत्पन्न कमावले. या गाड्यांना त्या भागातील कांही दादांनी तलवारीच्या धाकावर पैसे वसुली पण केली. त्याची कोणीच तक्रार केली नाही. पण 52 पत्यांचा नादच खुळा. त्याच्या शिवाय त्यांना राहिले जात नाही. आणि यातूनच जुगारातून होणाऱ्या उत्पन्नाचा आनंद त्यांनी गमावला होता. तो परत मिळविण्यासाठी वेगवेगळी आकडे मोड तयार होत राहिली.
कांही कारणामुळे एक-दुसऱ्यापासून दुरावलेले दोन जुगारी एकत्र आले आहेत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण नुसते दोन वैरी एकत्र आले तर जुगाराचा धंदा चालवता येत नसतो. त्यासाठी कांही नाहरकत प्रमाणपत्रे आवश्यकत असतात आणि ही नाहरकत प्रमाणपत्रे वजिराबाद चौकात असलेल्या कार्यालयातूनच मिळतात. त्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्यांनी ईतिहासाची पाने चाळून नाहरकत प्रमाणपत्र द्यावेत. कारण नाहरकत प्रमाणपत्र घेणारे नंतर डोक्यावर बसतात. याची जाण ठेवावी.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *