नांदेड (ग्रामीण)

आ.मोहनराव हंबर्डे यांच्या पाठपुराव्यामुळे सिडकोतील मुळ घर धारकाचा अनुपस्थित घरे हस्तांतरित प्रश्न मार्गी

नविन नांदेड(प्रतिनिधी)-सिडको नविन नांदेड भागातील मुळ घरधारकाचा अनुपस्थित घरे हस्तांतरित प्रश्न पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आ.मोहनराव हंबर्डे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री, नगरविकास मंत्री व सिडकोचे वरीष्ठ अधिकारी व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यात झालेल्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लागला आहे .

सिडको नविन नांदेड परिसरात योजना क्रंमाक १ ते ४ मध्ये अनेक मुळ घरधारक नसल्याने मुद्राकाचा आधारावर अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हि घरे घेतल्याने ही घरे मुळ घरधारकाचा अनुपस्थित हासतांतरीत करण्याची मागणी होत होती,त्यातला त्यात २००५ मध्ये ही योजना काही दिवसांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या मुळे काही जणांना यांचा लाभ झाला परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही योजना पुन्हा चालू करण्यासाठी अनेक घरधारकांनी व विविध सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांचा वतीने करण्यात आली पंरतु या मागणीला वरीष्ठ अधिकारी यांच्या कडुन प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी या प्रकरणी प्रलंबित व सिडको परिसरातील अनेक घरधारकाचा जिव्हाळयाचा असलेल्या मुळ घरधारकाचा अनुपस्थित हासतांतरीत प्रश्न सोडविण्यासाठी सिडको औरंगाबाद व नविन नांदेड येथील प्रशासक यांच्या कडे मागणीचा पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, नगरविकास मंत्री तनपुरे, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, मनपाचे स्थायी समितीचे सभापती विरैद्रसिंह गाडीवाले, नगरविकास सचिव भुषण गगराणी, मुख्य प्रशासक व सह व्यवस्थापकीय संचालक एस.एस.पाटील, सिडको नविन नांदेड प्रशासक भुंजग गायकवाड, विकास अधिकारी कपिल राजपुत यांच्या सह अधिकारी व प्रमुख कर्मचार्‍यांच्या ऊपसिथीत ९ जुनं रोजी मुंबई मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या वेळी सह व्यवस्थापकीय संचालक एस.एस.पाटील यांनी सिडको संचालक मंडळ बैठकीत हा प्रस्ताव सादर करून तात्काळ मान्यता घेऊन मंजुरी घेण्यात येऊन सोडविण्यात येईल असे सांगितले. जिल्हायांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला व तात्काळ मुंबईत बैठकीत घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिडको वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.