अर्धापूर (प्रतिनिधी)-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्धापुर शाखे कडून शंकरराव चव्हाण महाविद्यालया चे प्राचार्य के. के. पाटील यांच्या सोबत विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक अडचणी चर्चा करण्यात येऊन विविध विषयावर निवेदन देण्यात आले.
गेल्या काही काळात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे अर्थीक उत्पन्नाते साधन ठप्प होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. यावर महाविद्यालयाने विचार करून या कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा द्यावा तसेच महाविद्यालय बंद असलेल्या काळात ज्या गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही त्यांचे शुल्क लवकरात लवकर विद्यार्थ्यांना परत करावे अन्यथा अभाविप विद्यार्थी हितासाठी आंदोलन करेल या मागणीसाठी निवेदन दिले आहे.
यावेळी अभाविप चे धनंजय शेटे,विशाल गिरी,शुभम मठपती,रोहित शेटे ,पवन सोनटक्के,सोमेश शेटे,तेजस जाधव,निलेश गादगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
