अर्धापूर (प्रतिनिधी)-मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मासे खरेदी साठी ग्राहकांची गर्दी. अर्धापूर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मासे विक्री होत असुन करोना आजाराचा संसर्गामुळे सर्व बाजार ठप्प होते. आता वेगवेगळ्या प्रकारच्या मासे खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल सुरू आहे.
जिल्ह्याभरात करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने अनेक व्यवसायांना त्याचा फटका बसत आहे. अन्य व्यवसायाप्रमाणे मत्स्य विक्रेत्यांना करोना संसर्गाचा जबर फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षी पाऊस जोरदार झाल्याने जिल्ह्यातील सर्वच लघू-मध्यम व मोठे प्रकल्प काठोकाठ भरल्याने मत्स्य व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने यावर्षी आर्थिक घडी सुधारेल या आशेवर असलेल्या व्यावसायिकांना करोना संसर्गाचा मोठा फटका बसला.असुन अर्थाक परिस्थिती विस्कटली.
मोठ्या प्रमाणावर उत्पादन होवूनही ग्राहक नसल्याने गेल्या काही महिन्यापासून चिंतेत असलेल्या मत्स्य व्यवसायिकांना मृग नक्षत्राने चांगला दिलासा मिळाला. तालुक्यासह जिल्हाभरात वेगवेगळ्या भागात मरळ,कत्तला,बल्लो,पाॅपलेट, रऊ या जातीच्या माशांचे उत्पादन होते.जिल्ह्यातील व तालुक्यातील छोट्या-मोठ्या तलावातील मासे तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यासह परदेशात जातात, माशांची निर्यातीतून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. शेकडो कुंटूबिंयाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे.
लॉकडाऊन, बाजारपेठ बंद असल्याने विक्री व निर्यात पूर्णपणे ठप्प होती. मृग नक्षत्रात मासे सेवन करण्याची मोठी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. दमा आजाराने त्रस्त नागरिकांनी आजच्या दिवशी मासे खाल्याने त्यांना आराम मिळतो असे मानले जाते. बाजारात मोठी गर्दी केली होती.अर्धापुर शहरातील बाजार पेठेत माशांची विक्री होत असून चांगल्या दराने मासे विक्री होत असल्याचे विक्रेते मारोती कुकडे,नंदाबाई कुकडे,मोहन कुकडे,अविनाश बावणे यांनी सांगितले.
