नांदेड(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांचे माळ हळद, तुर, कापूस, हरभरा आदी पिक खरेदी करून शेतकऱ्यांचे 1 लाख रुपये न देणाऱ्या विरुध्द हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जवळगाव ता.हिमायतनगर येथील दिगंबर संभाजी निर्मले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 एप्रिल 2021 रोज पर्यंत कांही जणांनी शेतकऱ्यांकडून त्यांनी पिकवलेली विविध पिके खरेदी केली. यात 23 क्विंटल हरभरा होता. त्याची एकूण किंमत 1 लाख 16 हजार 350 रुपये होती. त्यापैकी फक्त 16 हजार रुपये दिले आणि 1 लाख रुपये एका महिन्याच्या अंतराने देईल असे सांगितले. पैसे दिले नाही म्हणून आता त्या खरेदीदाराविरुध्द हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक देवकते अधिक तपास करीत आहेत.
