न्यायालयात तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून दोन वर्षापासून फरार असणाऱ्या युवकाला जेरबंद केले आहे. आज 7 जून रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.खरात यांनी या 21 वर्षीय युवकाला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सन 2019 मध्ये नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 188/2019 भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (3) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 4, 6, 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल झाला होता. हा गल्लीच प्रकार घडविणारा 21 वर्षीय युवक गणेश माधवराव मारकेवार रा.चिखलवाडी हा फरार झाला होता. तो पोलीसांना सापडत नव्हता.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार गणेश मारकेवार हा आपल्या घरी आला होता. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार गजानन किडे, विजय नंदे, संजय जाधव, संतोष बेल्लूरोेड, चंद्रकांत बिरादार, मनोज परदेशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम आणि सायबर विभागाचे महेश बडगु यांना आदेशीत करून त्याला जेरबंद केले. दोन वर्षापासून फरार असलेल्या पोक्सो कायद्यातील आरोपीला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
दोन वर्षापुर्वीचा गुन्हा क्रमांक 188 चा तपास पोलीस उपनिरिक्षक सुरजितसिंघ माळी यांच्याकडे आहे. त्यांनी आज आपले सहकारी पोलीस अंमलदार दुधभाते, बालाजी लामतुरे, प्रदीप कांबळे यांच्यासह पकडलेल्या गणेश मारकेवारला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील आणि आरोपीचे वकील ऍड. रामसिंघ मठवाले यांचा युक्तीवाद ऐकून न्या.एस.एस.खरात यांनी मारकेवारला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
