नांदेड (ग्रामीण)

इंधन दरवाढीविरोधात अर्धापुरात काँग्रेसचे धरणे आंदोलन…!

 

अर्धापूर (प्रतिनिधी)- वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे सोमवारी अर्धापूर येथील किसान पेट्रोल पंपासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. वाढती बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी विरोधी कायदे, देशात ढासळलेली अर्थव्यवस्था, नोटबंदी, जीएसटी ने केलेली दुर्दशा, गॅसचे वाढलेले दर आदी संदेशांचे फलक घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.
या सात वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामकाजाच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने निषेधार्थ अर्धापूर शहरातील नांदेड-नागपुर रोड वरील किसान पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळामध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर म्हणाले की केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस आदी दरवाढीमुळे सामान्य जनतेचे बेहाल होत आहे. केंद्र शासनाने अच्छे दिन आने वाले है म्हणत सत्तेवर आले पण केंद्र सरकारने हमारे पुराने अच्छे दिन लोटादो म्हणत.केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा जनता येणाऱ्या निवडणूकीत धडी शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे संजय देशमुख म्हणाले तर या दरवाढीविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास अघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,
काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण,शेख लायक,डॉ.विशाल लंगडे,कृऊबाचे संचालक संजय लोणे,प्रविण देशमुख,
जिल्हा सचिव निळकंठ मदने,नगरसेवक गाजी काजी,मुस्वीर खतीब,सोनाजी सरोदे,कामाजी अटकोरे,शिवसेना शहरप्रमुख सचिन येवले,सरपंच शिवलिंग स्वामी,राजकुमार जाधव,
युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव उमाकांत सरोदे,शंकर टेकाळे,
बाळू पाटील धूमाळ,युवकचे विधानसभा अध्यक्ष मदन कल्याणकर,दिलीप डाहाळे,बालाजी कदम,गोविंद गोदरे,शंकरराव टेकाळे,
राजाराम पवार,शंकर ढगे,मुत्तेदरखान पठाण,व्यंकटी राऊत,सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष
शेख मकसुद,संतोष कपाटे,चंद्रमुनी लोणे,बबनराव लोखंडे,दिलीप गायकवाड
यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.