नांदेड (ग्रामीण)

अर्धापूर शहरात महावितरणच्या वतीने मानसुनपुर्व कामे प्रगतीपथावर…!

अर्धापूर (प्रतिनिधी): – पावसाळ्याच्या दिवसामध्ये ग्राहकांना अविरत विज मिळावी.हे महावितरणकरिता एक आव्हान असते. पावसाळा सुरू होत असुन पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित होवु नये या मान्सूनपूर्व तयारीसाठी अर्धापूर महावितरण सज्ज झाले आहे.
महावितरणच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यासाठी पावसाळ्याआधीच महावितरणने काम सुरू केले आहे. शहरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर आलेल्या फांद्या छाटण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे. शहराच्या काही भागातील काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत असतात पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत रहावा, वीज यंत्रणा कोलमडू नये व ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी महावितरणच्या वतीने दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत.
अर्धापूर शहरात ५० च्या वर डिपी असुन कोरोना च्या काळातही अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी,अधिकारी कार्यरत असुन मान्सूनपूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. महावितरणची बहुतांश यंत्रणा ही उघड्यावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. काही ठिकाणी त्या तारांना घासत असतात. त्यादृष्टीने फांद्या छटाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोंबकाळणा-या तारा, तारांचे गार्डींग ढिले झाल्याने तारा लोंबकळतात.शिवाय ढिले झालेले स्पॅन टाईट करण्याचे काम सुरु आहे. तसेच दोन खांबांमधील तारांचा झोल पडून जमिनीपासूनचे अंतर कमी होते. अशावेळी तारा ओढून घेणे, ट्रान्स्फॉर्मरमध्ये तेल योग्य पातळीपर्यंत ठेवणे,आर्थिंग पावसाळ्यापूर्वी मजबूत करून घेणे, केबल जॉईंटची पाहणी करणे डिपी बदलने आदी कामे जलदगतीने सुरू आहेत.साहाय्यक अभियंता नागेश खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञ ज्ञानेश्वर सवंडकर,गंगाधर शिंदे,सय्यद मुखिद,शिवा कदम,अर्जुन कानोडे,शेख हिमायत,लक्ष्मण पुरी आदी कर्मचारी दुरूस्तीची कामे करत आहेत. परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण शाखा अर्धापूर शहरच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे खांब कोसळणे,तारा तुटणे ट्रान्स्फाॅर्मर जळणे आदी प्रकार घडतात.विज खंडित होवु नये यासाठी मान्सूनपूर्व कामे जलदगतीने सुरू आहेत.नागरिकांनी सहकार्य करावे.

– नागेश खिल्लारे
साहाय्यक अभियंता अर्धापूर शहर शाखा

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *