नांदेड

7 जून पासून पुन्हा एस.टी.बसेस धावतांना दिसणार रस्त्यावर

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशी भाड्यात कोणतीही वाढ न करता आरक्षीत बस प्रवास सुरू केल्याची माहिती निर्गमित केली आहे. बसमध्ये प्रवास करतांना शासनाच्या नियमांचे पालन आवश्यक सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नांदेडच्या व्यवस्थापकांनी जारी केलेल्या माहितीनुसार दि.7 जूनपासून विविध ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निर्जतूंक केलेल्या एस.टी.बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहेत. प्रवासासाठी ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशी भाड्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल त्यानुसार सुरू करण्यात आलेल्या एस.टी.बसेस कायम ठेवण्यात येतील अशी माहिती दिली आहे.
नांदेड येथून इतरत्र जाणाऱ्या एस.टी.बसेसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. या बसेस 7 जून पासून धावतील. नांदेड-लातूर सकाळी 6 वाजल्यापासून दर तासाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. नांदेड- हिंगोली सकाळी 6.15 वाजेपासून दर तासाला एक बस सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत. नांदेड-बीड सकाळी 5.30, 7 आणि 8 वाजता लोहा,गंगाखेड, परळी मागे जाणाऱ्या गाड्या निघतील. याच रस्त्यावर परभणी मार्गे जाणाऱ्या गाड्या सकाळी 7.30 आणि दुपारी 12.30 वाजता निघतील. नांदेड-पुणे सकाळी 6.45 ला गंगाखेड, अहमदनगरमार्गे जाणारी गाडी आणि सायंकाळी 7 वाजता लातूर, बाशी मार्गे जाणारी गाडी. नांदेड-सोलापूर औसा मार्गे जाणाऱ्या गाड्या सकाळी 8, 10, दुपारी 12 आणि रात्री 9.30 वाजता निघतील. नांदेड-औरंगाबाद दुपारी 1.30 आणि 3.15 वाजता बसेस निघतील. नांदेड-नागपूर सकाळी 7 आणि रात्री 9 वाजता. नांदेड-कोल्हापूर सकाळी 7.30 आणि रात्री 8.30 वाजता. नांदेड-भुसावळ-सकाळी 7.30 वाजता. नांदेड-शेगाव सकाळी 6 वाजता. नांदेड-अकोला सकाळी 8.30 वाजता. नांदेड-उमरी सकाळी 7, 7.30, दुपारी 1 आणि 1.30 वाजता निघतील. नांदेड-मुदखेड सकाळी 10.30, 11.15, दुपारी 3.30 आणि 4.15 अशा वेळेस या गाड्या नांदेड डेपातून निघतील. प्रवाशांनी एस.टी. बसेसच्या प्रवासाचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.