नांदेड

1 जुलैपासून नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एल.अनेकर

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस.जी.दिघे यांनी मागील महिन्यात केलेल्या बदल्यांमध्ये एक बदल करून नांदेडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी एस.एल.अनेकर यांची नियुक्ती केली आहे.
नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप हे हे आपल्या कार्यकाळाप्रमाणे दि.30 जून 2021 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी अहमदनगर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एल.अनेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील बदल्यांमध्ये एस.एल.अनेकर यांना वाशिम जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश करण्यात आले होते. आपल्या बदल्यांच्या 7 मे रोजीच्या आदेशात हा बदल करून नांदेड जिल्ह्याच्या रिक्त होणाऱ्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश या पदावर एस.एल.अनेकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *