क्राईम

मटक्याचा खेळ अनादी काळापासून आजपर्यंत सुरूच

कंथक सुर्यतळ

नांदेड-मटक्याचा खेळ नांदेड जिल्ह्यात सर्वत्र सुरूच आहे. प्रसार माध्यमांनी त्याबद्दल कांही लिहिले तर आपल्या आवडत्या बुक्या वगळून पोलीस मटक्यावर गुन्हा दाखल केल्याचे दाखवतात. त्यामुळे मटक्याचा खेळ कधीच बंद होणे शक्य नाही. वाघी रस्त्यावर असणाऱ्या एका शटरमध्ये हा मटक्याचा खेळ कायम सुरू असतो.
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात मटक्याचा खेळ अनादी काळापासून कधीच बंद झाला नाही. तो सुरू ही असावा असे अनेकांचे मत आहे. कारण अनेकांच्या पोट भरण्याचे साधन मटक्याचा खेळ आहे. या खेळात 3 आकडे काडून त्याची बेरीज होते आणि त्या बेरजेचा जो कांही आकडा येतो तो त्या दिवशीच्या मटक्याचा आकडा ठरतो. असा हा मटका गोल असतो पण त्यात भरपूर आकृत्या तयार होतात आणि या आकृत्या जशा तयार होतात. त्या कोणाला उर्दहनिर्वाहचे साधन देतात. कोणाला मोदकांचा प्रसार देतात आणि कोणाला भिक मागण्यासाठीची उत्कृष्ट जागा तयार करतात.
मटका संदर्भाची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रसार माध्यमे त्याबद्दल लिखान करतात बातमी प्रसिध्द झाल्याबरोबर आपल्या लाडक्या बुक्कीला वगळून पोलीस कांही मटका बुक्कीवर कार्यवाही करतात आणि आम्ही भरपूर कांही केले असे कागदोपत्री अभिलेख तयार करतात. पण यामुळे मटक्याचा खेळ कधीच बंद झाला नाही. प्रसार माध्यमांनी बातमी लिहिने म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांना वर कमाई करण्याचा नवीन धंदा देणे असाच होतो.
वाघी रस्त्यावर एका ठिकाणी असलेल्या कांही दुकानांपैकी छायाचित्रात दिसणाऱ्या उघड्या शटरमध्ये मटक्याचा खेळ कायम सुरू आहे. पण कोणीच त्याकडे लक्ष देत नाही. कधी असेही वाटते की, कोणी लक्ष देवू पण नये कारण त्या मटक्याच्या खेळातून अनेकांचे होणारे भले थांबेल म्हणून मटक्याचा खेळ सुरू राहायला हवा. पण दुर्देव असे आहे की, मटक्याशी जुळलेला माणुस हा भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रथम व्यक्ती आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्यांचा खेळ का बंद व्हावा असे वाटते. या मटक्याच्या खेळात जी मोठी व्हाईट कॉलर मंडळी आपले प्रस्थ असल्याचे सांगते. त्यांच्यापर्यंत हात नेण्याची कोणाची हिंम्मतच नाही. कांही वर्षांपुर्वी असाच एक मटकाबहाद्दर महाराष्ट्र राज्यात मंत्री झाला होता. त्यावेळी राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याला सलाम करायची मग मटक्याचा खेळ चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही.
वाघी रस्त्यावर यापुर्वी मटका आणि जुगार या खेळांच्या कारणावरून अनेकदा हाणामारी, कांही खून घडले आहेत. म्हणून या रस्त्याचा उल्लेख मटक्याच्या खेळासाठी करणे आणि त्यावर प्रशासनाचे लक्ष आणण्यासाठीचा हा शब्द प्रपंच.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *