क्राईम

एक जबरी चोरी, एक चोरी, चार दुचाकी चोऱ्या आणि तीन मोबाईल चोरी

2 लाख 77 हजार 800 रुपयंाचा ऐवज लंपा
नांदेड(प्रतिनिधी)-मालेगाव वसमत रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करून जबरी चोरी झाली आहे. नावघाट परिसरात एक घरफोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. धर्माबाद, मुखेड, अर्धापूर आणि इतवारा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक-एक दुचाकी चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोबाईल चोरीला गेला आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून 2 लाख 77 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
राजेंद्रकुमार शिवलिंगअप्पा नखाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जून रोजी 10.15 वाजता त्यांच्या मोटारसायकलवर बसून ते भोकर फाटा ते वसमतकडे जात होते.भोकर फाटा येथे त्यांची मेडीकल दुकान आहे. मालेगाव -वसमत रस्त्यावर पद्मावती पेट्रोल पंपाजवळून ते जात असतांना एका दुचाकी गाडीवर 3 जण आले आणि त्यांनी नखातेची दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी करण्यास भाग पाडले. सोबतच त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 6 हजार रुपये, 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुरवसे अधिक तपास करीत आहेत.
यश भारत वाघमारे रा.नावघाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जूनच्या मध्यरात्री 1.30 वाजता त्यांच्या घरात ठेवलेले 3 मोबाईल व 10 हजार रुपये रोख रक्कम असा 25 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ईतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पेद्दे हे अधिक तपास करीत आहेत.
विरभद्र संजय आऊळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची दुचाकी गाडी क्रमंाक एम.एच.26 बी.यु.5436 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 3 जूनच्या रात्री 11.30 ते 4 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान रुक्मीणीनगर धर्माबाद येथून चोरीला गेली आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार स्वामी अधिक तपास करीत आहेत.
उपजिल्हा रुग्णालय मुखेडच्या गेटसमोर संदीप भारत पवार यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एफ 8037 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी 2 जून रोजी दुपारी 12.30 वाजता उभी केली होती. अर्ध्या तासात ही गाडी चोरीला गेली आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार महेंद्रकर अधिक तपस करीत आहेत.
शिक्षक असलेले शशांक संभाजी कुंटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मे रोजी दुपारी 1 वाजता बसश्र्वेरनगर मालेगाव ता.अर्धापूर येथे त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.झेड.5648 रात्री 1 वाजता उभी केली होती. पहाटे 5 वाजेपर्यंत ही 35 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली होती. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हुंडे अधिक तपास करीत आहेत.
संतोष बाबूराव कल्याणकर यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 वाय.0516 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 2 जून रोजी रात्री 8.30 वाजता सुलभ शौचालय देगलूर नाका नांदेड येथे उभी केली होती. रात्री 9.15 दरम्यान, फक्त 45 मिनिटात ही दुचाकी चोरीला गेली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बिसाडे हे अधिक तपास करीत आहेत.
संदीप किशनराव मंगनाळे हे अंकुर हॉस्पीटलचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जून रोजी मध्यरात्री 3.30 वाजेच्यासुमारास एक व्यक्ती मी रुग्णाचा नातेवाईक आहे असे सांगून पाण्या घेण्याचे कारण दाखवून हॉस्पीटलमध्ये आला आणि एक टॅब 35 हजार रुपये किंमतीचा आणि 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 43 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चांदणे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *