नांदेड (ग्रामीण)

अर्धापूरात ठिक-ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

अर्धापूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामपंचायत,शासकिय कार्यालय,शिवप्रेमी नागरिक,घरोघरी ठिक -ठिकाणी शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायत च्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून सोहळा साजरा करण्यात आले. यावेळी प्रथम नागरिक सरपंच कांचनताई सूर्यवंशी,उपसरपंच अरविंद पांचाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,ग्रामपंचायत सदस्य सरस्वतीबाई सुरोशे,विमलबाई तारडे,इंग्रजीत टेकाळे,राजेश टेकाळे,सरपंच प्र.कुलदीप सुर्यवंशी,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे,गोतम सुर्यवंशी,उतमराव तारडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर सुर्यवंशी ,प्रकाश दादज्वार, गणेश तारडे,भीमराव टेकाळे आदींनी परिश्रम घेतले. लोणी खुर्द ग्रामपंचायत मध्ये शिवराज्यभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी सरपंच अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे यांच्या हस्ते शिवराज्यभिषेक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लोणे,कोंडिबा लोणे,दिपक लोणे, परसराम लोणे,शामराव लोणे, सुरेश लोणे यांच्या सह गावकरी मंडळी उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *