पुणे (प्रतिनिधी)- शहदा तालुक्यातील लोणखेड़ा रोड वरील शिवप्लाझा येथे विश्वकल्याण ग्रुप तर्फे पर्यावरण दीन साजरा करण्यात आला.वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन भविष्यातील पीढीचा विमा आहे अशा शब्दात पल्लवी प्रकाशकर यांनी पर्यावरण दिनाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु जाधव होते तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते माणक चौधरी,विश्वकल्याण ग्रुपचे जगदीश पटेल अवंतिका फाउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, लोणखेड़ा जेष्ट नागरिक संघाचे सचिव देवीदास पाटील,शहादा येथील जेष्ट नागरिक डि जी पाटील,रविंद्र चौधरी, झिपरु पाटील, जयंट्सच्या आशा चौधरी आदी उपस्तीत होते.कार्यक्रमात सर्व प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले त्या नंतर वृक्षारोपण करण्यात येऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी माणक चौधरी, पल्लवी प्रकाशकर, डि जी पाटील यांनी पर्यावरण बाबत मार्गदर्शन केले.विश्व कल्याण ग्रुपने 38 महिन्यात 1,12,760 एवढे वृक्ष वाटप केले.कार्यक्रमाच्या शेवटी वृक्ष प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डि जी पाटील यांनी तर सुत्रसंचलन जगदीश पाटील व आभार देवीदास पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब सूर्यवंशी,ज्ञानेश्वर लोहार,संस्कृती चौधरी यांनी परिश्रम घेतले.
