नांदेड

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनपा व वृक्ष मित्र फाऊंडेशन तर्फे वृक्ष लागवड आणि वृक्ष वाटप

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानातर्गत गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. हरित नांदेड या योजनेच्या तिसर्‍या पर्वाचा शुभारंभ दि. 5 जून पर्यावरणदिनी एक व्यक्ती एक झाड योजनेअंतर्गत वृक्ष दत्तक योजनेद्वारे विसावा गार्डन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे झाला.
या वृक्षलागवडीचा शुभारंभ महापौर सौ. मोहिनीताई येवनकर यांच्या हस्ते झाला.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, .आयुक्त डॉ. सुनील लहाने, .उपमहापौर खान मसूद अहमद खान, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सौ. संगीताताई पाटील-डक, उपसभापती गीतांजली हटकर, मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार, नगरसेवक गड्डम, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्लाह बेग, वन परिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, जहागीरदार वृक्ष मित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, कैलाश अमिलकंठवार, सचिन जोड, प्रीतम भराडीया, गणेश साखरे, प्रल्हाद घोरबांड, अतुल डोणगावकर, प्रदीप मोरलवार, अनंत कुलकर्णी या सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
नांदेड शहरातील विविध भागात मनपा व वृक्षमित्र परिवाराच्या वतीने वृक्षप्रेमींकडून गूगल फॉर्म भरून घेण्यात आला होता त्या सर्व वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेणार्‍या 200 नागरिकांना भाग्यनगर कमानीजवळ व मनपा मुख्य इमारतीच्या आवारात स.सदस्य किशोर स्वामी, आनंद चव्हाण, जयश्री पावडे, अमितसिंग तेहरा, सतीश देशमुख यांच्या हस्ते रोप मोफत भेट देण्यात आले. या रोपांचे पालकत्व स्वीकारुन संवर्धनाची जबाबदारी वृक्षप्रेमींनी पार पाडावी, अशी शपथ घेण्यात आली. कोरोनाच्या सुरक्षा नियमावलीचे बंधन पाळून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.