नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील खाजगी घरात राहणाऱ्या अनेक पोलीसांचे घरभाडे मागील 6 महिन्यापासून मिळाले नाही. सोबतच कालबध्द पदोन्नतीचे आदेश जारी केले. पण त्यामुळे होणारी पगारातील वाढ आणि थकबाकी रक्कम पोलीसंाना अद्याप मिळालेली नाही.
पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी शासकीय घरे असतात. जे व्यक्ती त्या घरांमध्ये राहतात त्यांच्यावेतनातून घरभाडे वजा होत असते. सोबतच ज्यांनी शासकीय घर रिकामे करून स्वत:ची घरे बांधली आणि ते त्यात राहतात अशा लोकांना वेतनात जोडून घरभाडे मिळत असते. या संबंधाची प्रक्रिया पुर्ण करून सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या पोलीस अंमलदारांना अद्याप त्यांनी खाजगी घरात राहतात म्हणून त्यांना नियमाप्रमाणे मिळणारे घर भाडे अद्याप देण्यात आलेले नाही. सातवा वेतन आयोग, ज्या शहरात वास्तव्य आहे त्या शहराची वर्गवारी यानुसार हे घर भाडे निश्चित होत असते आणि ते आता वेतना जोडून अदा केले जाते. शासकीय घरात राहणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या वेतनातून त्यांचे घरभाडे कपात होत असते. या पध्दतीला कोणाचाही विरोध नाही. पोलीसांच्या घरामध्ये अनेक भानगडी होत्या. उदाहरणार्थ एखादा पोलीस अंमलदार स्वत:च्या खाजगी घरात राहत असेल तरीही त्याच्या नावावर असलेले शासकीय घर त्यांनी रिकामे केलेले नसायचे इतर पोलीस अंमलदारांना तो पोलीस अंमलदार शासकीय घर भाड्याने देत असे. सध्या या परिस्थितीत मोठा बद्दल झाला आहे. हा ईतिहास होता. पण आजच्या वर्तमानात सुध्दा 94 टक्के पोलीस दलातील पोलीस अंमलदार आहेत तरीपण त्यांच्या सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. असाच प्रकार हे घर भाडे देण्यात होत असून मागील सहा महिन्यांपासुन अनेकांचे घरभाडे थकलेले आहे. याकडे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी लक्ष देवून काम करावे अशी अपेक्षा पोलीस खात्यातून व्यक्त होत आहे.
सन 2020 च्या शेवटच्या सत्रात आणि सन 2021 च्या एप्रिल महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातील काल बध्द पदोन्नती या विषयाला पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी महत्व देवून जिल्ह्यातील सर्वच पोलीस अंमलदाराच्या कालबध्द पदोन्नत्या सुनिश्चित केल्या. ज्यांच्याविरुध्द कांही प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी, शिक्षा अशी लटांबळे होती ते पोलीस अंमलदार कालबध्द पदोन्नत्यांपासून वंचित राहिले आहेत. कालबध्द पदोन्नती सुनिश्चित झाल्यानंतर त्यांना पुढील पदाचे वेतन त्याच दिवसापासून मिळणे अपेक्षीत आहे. पण सन 2020 च्या आणि सन 2021 च्या दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये झालेल्या कालबध्द पदोन्नत्यांचे दिवस सुनिश्चित झाले पण अद्याप कालबध्द पदोन्नतीनंतर मिळणारे वाढीव वेतन अद्याप पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. या विषयाकडे सुध्दा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी लक्ष देवून पोलीस अंमलदारांचे हे प्रलंबित कार्य पुर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
