पोलीसांचे जनतेला मदतीचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-पुणेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात 65 ते 70 वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांनी जनतेला आवाहन करून या अनोळखी मयत माणसाची ओळख पटण्यासाठी मदत करावी. मदत करावी असे सांगितले आहे.
आज दि.4 जून रोजी सकाळी पुणेगाव शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात एक 65 ते 70वयोगटातील अनोळखी माणसाच्या मृतदेह सापडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने पांढरे धोतर आणि कमीज तसेच पांढरी बनियान परिधान केलेली आहे. यांच्या गळ्यात लिंग आहे.
पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत माणसाबाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी त्वरीत नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, दुरध्वनी क्रमांक 02462-226373 वर संपर्क साधून माहिती द्यावी तसेच गोविंद खैरे यांचा मोबाईल नंबर 9890186722 यावर सुध्दा माहिती देता येईल.
