ताज्या बातम्या

हिरव्या मिरचीच्या गुन्हयात आदेश विजय कबाडे यांचा आहे

कागदोपत्री मुरब्बी आहेत म्हणे अपर पोलीस अधीक्षक 
नांदेड,(प्रतिनिधी)- फौजदारी प्रक्रिया संहितेतील कोणत्याही पानावर उल्लेख नसतांना सुद्धा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी हिरव्या मिर्च्या उगवण्याचा केलेल्या प्रयत्नात गुन्हा दाखल करण्याचा आदेश नांदेडच्या अपर पोलीस अधीक्षकांचा आहे असे लिहून ठेवले आहे.त्या हिरव्या मिर्चीचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी अपर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या कडे होता.आता सर्वच काही गोल गोल केले जाणार याची शक्यता जास्त वाढली आहे.
                         नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्या व्हाट्स अप संकेतस्थळावर मुंबई येथून आलेल्या अर्जानुसार हिरव्या मिरच्यांशी संबंधित गुन्हा क्रमांक २७८/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,५०४ आणि इतर कलमानुसार दाखल करण्यात आला.हा गुन्हा दाखल करतांना अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक यांच्या परवानगीने गुन्हा दाखल असे स्टेशन डायरी नोंद क्रमांक ३८ मध्ये दिनांक ८ मे २०२१ रोजी २२.१७ वाजता लिहिलेले आहे. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेत कोणत्याही पानावर असे लिहिलेले नाही की,गुन्हा दाखल करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. तरीही असे लिहून घेण्यात आलेले आहे.असा स्पष्ट आणि पारदर्शक कारभार सुरु आहे नांदेड पोलीस दलात. अश्या प्रकारे हिरव्या मिर्च्या उगवल्या गेल्या. पण एवढी मेहनत करून सुद्धा त्या हिरव्या मिरच्या कोणाच्याही अंगी लागलेल्या नाहीत.

                          याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतांना असे समजले की,८ मे रोजी नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सुट्टीवर होते. त्या दिवशी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या कडे नांदेड अपर पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. कागदपत्रे बनवण्यात तरबेज असलेले विजय कबाडे यांच्यासाठी हा नवीन कागद तयार झाला आहे.हिरव्या मिरच्या अद्याप कोणालाही झोबलेल्या दिसल्या नाहीत.म्हणजे मिरच्या झोबतील याची पूर्व तयारी केलेली होती काय असा प्रयोग करण्याची ताकत सर्वाना प्राप्त झाली तर काय छान होईल.

चौकशी प्रक्रिया थंड बस्त्यात 
या हिरव्या मिरच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्या अगोदरच नांदेड ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकांनी आपले काही अत्यंत विश्वासू पोलीस अंमलदार अर्ज चौकशीसाठी मुंबईला पाठवले होते.त्यात आता एक पोलीस उप निरीक्षक झाले आहेत. अश्या लोकांविरुद्ध काही कार्यवाही असेल ती माहिती पाठवावी आणि  तो निर्णय स्थानिक अधिकाऱ्यानी घ्यावा असे पीएसआय पदोन्नती आदेशात लिहिलेले आहे. तरीही त्यांची ‘पूर्तता’ झाली आणि ते पीएसआय झाले आहेत. कारण या मिर्ची प्रकरणात लॉकडाउन असतांना कोणत्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने मुंबईला गेले होते याची चौकशी इतवारा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्याकडे आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. हिरव्या मिरच्यांसह काही दुसऱ्या चौकश्या सुद्धा सुरु असल्याची माहिती प्राप्त होत आहे.पण सर्व चौकश्या थंड बस्त्यात पडून आहेत. पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या कडून ‘सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ हे वाक्य अंमलात आणले जाईल अशी अपेक्षा आहे. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *