नांदेड शहर-६५ ; नांदेड ग्रामीण-२८;रुग्ण सुधारण्याची टक्केवारी- ९६.४९
नांदेड,(प्रतिनिधी)- शुक्रवारी सुद्धा आनंदाची बातमी आली. कोरोना बाधेने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज कोरोना बाधेतून मुक्त होणारे रुग्ण १७३ आहेत.नवीन सापडलेले रुग्ण १५० आहेत. आज बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९६.४९ आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ४ जून २०२१ रोजी कोरोना बाधेने कोणाचाही जीव घेतलेला नाही.
मनपा अंतर्गत विलगीकरण व जम्बो कोवीड सेंटर -१३०,जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल नांदेड -०७,खाजगी रुग्णालय -२५, किनवट-०१, मुखेड – ०४,लोहा – ०१, ,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी – ०४, हदगाव – ०१ अश्या एकूण १७३ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८६९७३ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.४९ टक्के आहे.
आज प्राप्त झालेल्या ३०४६ अहवालांमधील २८५५ अहवाल निगेटीव्ह आहेत, १५० अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ९०१३६ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ६६ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ८४ असे एकूण १५० रुग्ण आहेत.आजच्या १५० रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात ६५ रुग्ण आहेत. आज स्वॅब तपासणी १६९ अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ३६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०५ आहेत.
आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -३०, लोहा-०२, नांदेड ग्रामीण-१२, हदगाव – ०२, किनवट – ०३, हिंगोली – ०३, मुदखेड-०२, माहूर – ०३, परभणी – ०२, देगलूर – ०२, उमरी – ०२, भोकर -०२, यवतमाळ – ०१ असे ६६ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -३५, हदगाव-०४, नांदेड ग्रामीण-१६, कंधार – ०२, नायगाव – ०२, हिंगोली-०२,किनवट-०४,मुदखेड – ०५,यवतमाळ – ०१,उमरी – ०२, देगलूर – ०३,माहूर – ०१,हिमायतनगर – ०२,अर्धापूर – ०१,बिलोली – ०२,परभणी – ०२, असे एकूण ८४ रुग्ण आहेत.
आज कोरोनाचे ७६८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर
शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -१३, जिल्हा रुग्णालय-०२, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-३६, किनवट-२६, मुखेड-०६, देगलूर -०७, माहूर-०४, हदगाव-०३, लोहा-०५, भोकर – ०१, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३८५, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -२२४, खाजगी रुग्णालय-५६, असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात २५ रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी -१२२, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल -१२०.