

नांदेड(प्रतिनीधी)– निरोगी व दिर्घायुष्य राहण्यासाठी पर्यावरणाचे संतूलन राखणे अतिशय महत्वाचे आहे. त्यावर वृक्षारोपण हा एकमेव रामबाण उपाय आहे. त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण दिनी ( 5 जून) किमान एक रोपटे लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी, तसेच वृक्ष लागवड करून त्याचे आपापल्या वॉटस्अपवर स्टेटस ठेवावे, असे आवाहन नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आ. हंबर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, आपण कोरोना महामारीच्या संकटातून जात आहोत. कोरोना रुग्णांना सध्या प्राणवायू अर्थात ऑक्सीजनची मोठी गरज आहे. अशा वेळी नैसर्गिक ऑक्सीजन युक्त वातावरण निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. ऑक्सीजन देणारे झाडे लावावीत. त्यामुळे आज पर्यावरण दिनी प्रत्येक शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालयांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयात वृक्षारोपण करावे. विद्यार्थ्यांनीही आपापल्या घरी, अंगणात वृक्षारोपण करावे. वृक्षारोपण करून फोटो काढून आपापल्या वाट्सअपवर स्टेटस ठेवावे, असे आवाहन आ. हंबर्डे यांनी केले आहे.