क्राईम

खैरगाव पाटी जवळ ट्रॅक्टर पल्टी होऊन सरेगाव ता मुदखेड येथील दोघेजण ठार

अर्धापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोकरफाटा ते बारड -भोकर रस्त्यावर (खैरगाव पाटीजवळ) असलेल्या कॅनॉलजवळ ट्रॅक्टर उलटल्याने शुक्रवारी दुपारी १२.३० वाजातच्या सुमारास दोघेजण ठार झाले असल्याची घटना घडली आहे.यावेळी जखमींना बाहेर काढण्यासाठी महामार्ग पोलीसांना मोठी कसरत करावी लागली.
भोकरफाटा ते बारड रस्त्यावर असलेल्या तुकाराम पेट्रोल पंपासमोरील कॅनॉलकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याची घटना दि.४ जुन शुक्रवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टर उचलण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.यावेळी तुषार सुर्यभान कळने वय १५ वर्षे व पुरभाजी मारोतराव गिरे वय २० वर्षे दोघे रा.सरेगाव ता.मुदखेड हे ट्रॅक्टरखाली दबुन जागीच ठार झाले.यावेळी बारड महामार्गाचे सपोनि येवते, पो.हे.कॉ. शेख, स्वाधीन ढवळे, संतोष वागतकर, निलेवार, अमोल सातारे यांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले.


खरीप हंगामासाठी शेत मशागतीची कामे सुरू असून सदरील ट्रॅक्टर चालक शेत कामे करून जात होती कच्च्या रस्त्यावरून जात असतांना ट्रॅक्टर अचानक उलटून अपघात झाला असावा अशी नागरिकांकडून माहिती मिळाली.घटनास्थळी साहाय्यक पोनि आर टी नांदगावकर,पोलीस उपनिरीक्षक
साईनाथ सुरवसे,फौजदार कपील आगलावे, बालाजी तोरणे,जमादार बालजीराव कोकरे,बालाजी भाकरे,संतोष सुर्यवंशी आदींनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली अपघाताती मायतांना महामार्ग रुग्णवाहिकेणे अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.अर्धापूर पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.