अर्धापूर (प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिना निमित्त दि.३ गुरूवारी रोजी भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिना निमित्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख,विराज देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून पुष्ष हार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष विलास साबळे,भाजयुमोचे जिल्हा चिटणीस योगेश हाळदे,ओबीसी मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष बाबुराव लंगडे,नगरसेवक शिवराज जाधव,तुकाराम साखरे,तुकाराम माटे,वैभव माटे,गोविंद माटे यांच्या सह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थितीत होते.