क्राईम

भाचाने केला मामाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)- दि. ३ जून रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शहरातील गवळीपूरा भागात एका भाचाने आपल्या मामाला लाकडाने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव नागोराव नवघडे (४८), रा. देगावचाळ हे आपल्या मेव्हानाच्या घरी गवळीपूरा येथे गेले होते. दुपारचे जेवण तेथेच झाले आणि त्यानंतर झालेल्या चर्चेत वाद तयार झाला. या वादातून साहेबराव नवघडे यांचा भाचा अरूण किशन इंगोले (२०) याने आपल्या हातात लाकूड घेऊन त्याने मामाला भरपूर मारहाण केली. जखमा दिसत नव्हत्या, पण मामाची झालेली परिस्थिती पाहून त्यांचा मुलगा मनोज साहेबराव नवघडे याने त्यांना उपचारासाठी सरकारी रूग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मनोज नवघडेच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी अरूण किशन इंगोलेविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे गुन्हा क्र. १६४/२०२१ दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.