तहसील कार्यालयातील दुसऱ्या खोलीत पाठविले आहे.
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कर्तबगार अव्वल कारकून प्रेमानंद लाठकर यांची बदली करण्यात आली आहे. पण त्यांची बदली तहसील कार्यालयाच्या इमारतीबाहेर झाली नाही तर त्याच ईमारतीतील दुसऱ्या खोलीत करण्यात आली आहे. पुरवठा विभागात बाहेरच्या मंडळीला सोबत घेवून काम करण्यात तरबेज असलेले प्रेमानंद लाठकर गेल्या 7 वर्षापासून एकाच पदावर कार्यरत होते. प्रसार माध्यमांनी आपल्या लेखणीतून त्यांचे वर्तन सार्वजनिक केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुध्द एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. ती समिती चौकशी करत आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रेमानंद लाठकर यांची पुरवठा विभागातील अव्वल कारकुन पदावरुन बदली करून तहसील कार्यालयातीलच दुसऱ्या खोलीत त्यांना नियुक्ती दिली आहे. त्यांच्या पुरवठा विभागात श्रीमती ए.डी.चिनसाबवार यांची नियुक्ती झाली आहे. सोबतच माधव विक्रम मोरे यांचीही नियुक्ती पुरवठा विभागात करण्यात आली आहे. प्रेमानंद लाठकर यांची बदली झाली तेथे त्यांना तंगायो, इंगायो व कुटूंब अर्थ आणि त्या अनुषंगी काम काज करायचे आहे. नांदेड जिल्ह्याच्या महसुल विभागात फक्त नांदेड तहसील कार्यालयच आहे काय जेथे प्रेमानंद लाठकरसारख्या कर्तव्यदक्ष अव्वल कारकुनाची गरज आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. आता ही चौकशी बंद पडेल काय? असाही प्रश्न उपस्थित होते आहे. अनेकांच्या घरी राशन भरून आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडणाऱ्या प्रेमानंद लाठकर यांची आवश्यकता महसुल विभागाला असेल म्हणूनच त्यांची बदली करतांना फक्त खोली बदलण्यात आली आहे.
