ताज्या बातम्या

आनंदाची वातमी;कोरोनाने गुरुवारी एकही मृत्यू नाही;ऍक्टिव्ह रुग्ण फक्त ७९९ आत तरी निष्काळजी करू नका

सुट्टी झालेले रुग्ण-३४०;सापडले नवीन रुग्ण- १३२;
नांदेड शहर-६२ ; नांदेड ग्रामीण-२७;रुग्ण सुधारण्याची टक्केवारी- ९६.४५
नांदेड,(प्रतिनिधी)- गुरुवारी आनंदाची बातमी आली. कोरोना बाधेने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  आज कोरोना बाधेतून मुक्त होणारे रुग्ण ३४० आहेत.नवीन सापडलेले रुग्ण १३२ आहेत. आज बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९६.४५ आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार  दिनांक ३ जून २०२१ रोजी कोरोना बाधेने कोणाचाही जीव घेतलेला नाही असे लिहिण्याचे भाग्य अनेक दिवसांनी प्राप्त झाले आहे.त्याचा अत्यंत आनंद होत आहे. जनतेने आता तरी निष्काळजी करू नये अशी आमची पण विनंती आहे.आता नांदेड जिल्हयातील नवीन प्राप्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी सुद्धा ५ पेक्षा कमी असल्याने नांदेड जिल्हा पूर्ण पणे उघडला जाणार आहे.तरीही मागील चुकांना लक्षात ठेवून जनतेने पुढील काळात कोरोना नियमावली प्रमाणे वागावे, सर्व दक्षता घेऊन घराबाहेर पडावे असे आम्हालाही वाटते.
                      मनपा अंतर्गत विलगीकरण व जम्बो कोवीड सेंटर -२६२,जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल नांदेड -०४,खाजगी रुग्णालय -३९, धर्माबाद-०१, किनवट-०२, भोकर-०१, उमरी – ०१, कंधार – ०१, मुखेड – ०८, अर्धापूर – ०६, लोह – ०१, देगलूर – ०२, हियामतनगर  – ०७,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी – ०५, अश्या  एकूण ३४० रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८६८०० झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.४५ टक्के आहे.
                 आज प्राप्त झालेल्या ३०६६ अहवालांमधील २९११ अहवाल निगेटीव्ह आहेत, १३२ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ८९९८६ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ६७ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ६५ असे एकूण १३२ रुग्ण आहेत.आजच्या १३२ रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात ६२ रुग्ण आहेत. आज स्वॅब तपासणी १८३ अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब २३ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -२७, लोहा-०२, नांदेड ग्रामीण-१६, अर्धापूर – ०२, हदगाव – ०२, हिमायतनगर -०३, किनवट – ०३, हिंगोली – ०३, मुखेड-०३,   कंधार-०१,मुदखेड-०१,नायगाव-०१, माहूर – ०१, परभणी – ०२, असे  ६७ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -३५, हदगाव-०२,  मुखेड-०२, नांदेड ग्रामीण-११, कंधार – ०२, नायगाव – ०२,  हिंगोली-०३,किनवट-०२,भोकर-०२,मुदखेड – ०२,
लातूर -०१,यवतमाळ  – ०२,पुणे – ०१ असे एकूण ६५ रुग्ण आहेत.
              आज कोरोनाचे ७९९ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर

शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -१३, जिल्हा रुग्णालय-०३, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-३७, किनवट-२५, मुखेड-०८, देगलूर -०७,   बिलोली-०६,माहूर-१७, नायगाव-०१, उमरी-०१, हदगाव-०४, लोहा-०६,  भोकर  – ०१, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३८१, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -२१६, खाजगी रुग्णालय-७३, असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात २५ रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी -१२२, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल -११८.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *