नांदेड(प्रतिनिधी)-मौजे भेंडेवाडी ता.कंधार येथे एका लग्नात गेलेल्या कुटूंबियांचे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हानेगाव ता.देगलूर येथे न्यायालयाच्या आदेशानंतर एक चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये 25 लाख रुपये रोख रक्कम आणि 73 तोळे सोने ज्याची आजची किंमत 37 लाख 23 हजार रुपये आहे. चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्याची बेरीज केली तर ती पाऊण कोटीच्या जवळ जाते.
भेंडेवाडी येथील जानकाबाई संग्राम ढाकणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे कुटूंबिय आपल्या पुतणीच्या लग्नासाठी नांदेडला आले होते. दरम्यान त्यांनी घरी नसल्याची संधी पाहुन चोरट्यांनी त्यंाचे घर फोडले ही घटना 31 मे च्या सकाळी 5 वाजता लक्षात आली. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या भिंतीवरून चढून दोन दरवाज्यांचा कुलूप कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यात लोखंडी पेटीतील 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचे दागिणे आणि दुसऱ्या रुममधील कपाटात ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपये असा एकूण 2 लाख 82 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गंगलवाड अधिक तपास करीत आहेत.
देगलूर न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानुसार संजीव काशीनाथ आचारे रा.हणेगाव ता.देगलूर यांनी त्यंाच्याकडे तक्रार दिली होती की, 28 फेबु्रवारी 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 या एक तासाच्या वेळेत त्यंाच्या घरातून सोनल संजीवकुमार आचार्य (20), ईरशाद मोहियोद्दीन अत्तार (25), गौस मोहियोद्दीन अत्तार, ईस्माईल मोहियोद्दीन अत्तार आणि मोहियोद्दीन अब्दुल अत्तार या सर्वांनी मिळून शेती खरेदी करण्यासाठी ठेवलेले 25 लाख रुपये आणि 73 तोळे सोने चोरून नेले आहे. यानुसार देगलूर न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 156(3) नुसार मरखेल पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा क्रमंाक 88/2021 कलम 379, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बिरादार हे करीत आहेत. या गुन्ह्याच्या तक्रारीतील 73 तोळे सोने बाबतची किंमत तपासली असता त्याची एकूण रक्कम 37 लाख 23 हजार रुपये होते.
