नांदेड

बुधवारी नवीन रुग्ण सापडण्याची टक्केवारी ४.८३ टक्के

फक्त एका महिलेचा मृत्यू 
सुट्टी झालेले रुग्ण-३२३;सापडले नवीन रुग्ण- १५७;
नांदेड शहर-७१ ; नांदेड ग्रामीण-३१;रुग्ण सुधारण्याची टक्केवारी- ९६.२२
नांदेड,(प्रतिनिधी)- बुधवारी कोरोना बाधेने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या फक्त एकच आहे. आज कोरोना बाधेतून मुक्त होणारे रुग्ण ३२३ आहेत.नवीन सापडलेले रुग्ण १५७ आहेत. आज बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९६.२२ आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार  दिनांक २ जून रोजी नांदेड मधील एका  ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू लोटस रुग्णालयात झाला आहे. त्यामुळे आज पर्यंत कोरोना बाधेने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या १८९० झाली आहे.
                      मनपा अंतर्गत विलगीकरण व जम्बो कोवीड सेंटर -२६६,जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल नांदेड -०९,खाजगी रुग्णालय -४०, धर्माबाद-०१, किनवट-०३, अर्धापूर – ०२, हदगाव-०१, भोकर-०१,अश्या  एकूण ३२३ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८६४६० झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.२२ टक्के आहे.
                 आज प्राप्त झालेल्या ३२४५ अहवालांमधील ३०१५ अहवाल निगेटीव्ह आहेत, १५७ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ८९८५४ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ७१ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ८६ असे एकूण १५७ रुग्ण आहेत.आजच्या १५७ रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात ७१ रुग्ण आहेत. आज स्वॅब तपासणी १८१ अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ६६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०७ आहेत.
आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -३१, लोहा-०१, नांदेड ग्रामीण-१३, अर्धापूर – ०१, हदगाव – ०२, हिमायतनगर -०१, किनवट – ०२,हिंगोली – ०१, मुखेड-०३, उमरी-०२, भोकर-०२, कंधार-०३,मुदखेड-०३,नायगाव-०२, देगलूर-०३,चंद्रपूर-०१, असे  ७१ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -४०, हदगाव-०१,  मुखेड-०२, नांदेड ग्रामीण-१८, माहूर – ०२,अर्धापूर – ०१, कंधार – ०२, देगलूर – ०१,नंदुरबार – ०२, नायगाव – ०२,  हिंगोली-०३,किनवट-०२, बिलोली-०१,लोहा-०३,भोकर-०२,हिमायतनगर-०२,औरंगाबाद-०१,
नागपूर-०१, असे एकूण ८६ रुग्ण आहेत.
              आज कोरोनाचे १०१४ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर

शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -१२, जिल्हा रुग्णालय-०७, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-३४, किनवट-२२, मुखेड-०८, देगलूर -०९, भोकर-०१,  बिलोली-०६,माहूर-१७, नायगाव-०१, उमरी-०१, हदगाव-०३, लोहा-०७,  धर्माबाद – ०५, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -५६४, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -२३७, खाजगी रुग्णालय-७६, एनआरआय कोवीड सेंटर-०४, असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात ३० रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी -१२३, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल -११८.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *