अर्धापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कृषी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा कृषी पर्यवेक्षक शिवाजीराव शामराव बारसे कृषी विभाग ३६ वर्ष सेवा करून दि.३१ रविवारी रोजी सेवा निवृत्ती झाल्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कृषी पर्यवेक्षक शिवाजीराव शामराव बारसे हे कृषी विभागातून सेवा निवृत्ती कार्यक्राम घेण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी सिध्देश्वर मोळके,मंडळ अधिकारी सतिश सावंत,कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे,सहाय्यक अधिक्षक नजिर अहेमद,महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य सचिव वसंत जारीकोटे,जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पवार, प्रा.मनोहर पाटील,उपसरपंच बारसगाव बालाजी गोदरे,कृषी सहाय्यक देवजी बारसे आदींचा उपस्थितीत शिवाजीराव शामराव बारसे हे महाराष्ट्र राज्य कृषी कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष तथा अध्यक्ष नांदेड चेअरमन कर्मचारी पतसंस्था,विश्वेश्वर देवस्थान ट्रस्ट बारसगाव अध्यक्ष. यांनी मुंबई,कनकवली,रत्नागिरी , लातूर,नांदेड,किनवट,कंधार,अर्धापूर येथे ३६ वर्ष ९ महिने २७ दिवस कृषी विभागात सेवा बजावुन सेवा निवृत्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास चंद्रकांत भंडारे,वरिष्ठ लिपिक सतीश मोरे,मोहन बेरजे,कृषीसहायिका श्रीमती एस.डी.देशमुख,वाय.जी.बर्डे, व्ही.एल.मोरलवार याच्यासह कृषी विभागचे अधिकारी व कर्मचारी वर्ग शिवाजीराव बारसे यांच्या कुटुंबातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.