नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड गावातील मोबाईल टॉवरने दि.1 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पेट घेतला आगीचे लोंड आणि काळा धुर आकाशात उडतांना दिसत होता. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अर्धापूर पोलीस आणि अग्नीशमन दलाने प्रयत्न करून ही आग विझवली आहे. पण टावर खाली पडण्याची भिती अद्याप कायम आहे. यावर सोनखेड पोलीस लक्ष ठेवून आहे.
सोनखेडच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या वोडाफोन आणि आयडीयाच्या टावरने दुपारी 3 वाजेच्यासुमारास पेट घेतला. आगीचे मोठे लोंड आणि काळा धुर आकाशात उडत होता. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर, इतर पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. कांही वेळाने अग्नीशमन दल आले आणि आग अटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवीत हाणी झाली नाही अशी माहिती महादेव मांजरमकर यांनी दिली. आग विझल्यानंतर आणि टावरचे लोखंड थंड झाल्यानंतर या टावरची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेवू आणि ते खाली पडणार नाही याची दक्षता घेवू असे महादेव मांजरमकर यांनी सांगितले.
